पुणे : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या करुणा शर्मा यांना पुण्यात अटक झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र अजयकुमार देढेलादेखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अजय देढेच्या पत्नीने काल येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अजयसह करुणा शर्मांविरोधातदेखील ही तक्रार दाखल करण्यात आली होती. अजय देढे हा करुणा शर्माचा पीए म्हणून वावरत होता. मात्र त्यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यामुळे अजय देढेने त्याच्या पत्नीकडे घटस्फोटासाठी तगादा लावला होता. एवढेच नाही, तर अजय देढे आणि करुणा शर्मा हे संबंधित महिलेला धमकावतदेखील होते, अशी माहिती समोर आली आहे. करुणा शर्मांविरोधात यासंबंधी अॅट्रोसिटीचा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले होते.