नगर भाविकांसाठी निशुल्क काशी तीर्थयात्रा आणि भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

0
32

शहरातील भाविकांसाठी निशुल्क काशी तीर्थयात्रा आणि भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

नगर (प्रतिनिधी)- श्रावण अधिकमासच्या पार्श्‍वभूमीवर नवनाथभाऊ दहिवाळ (खरवंडीकर) यांच्या वतीने काशी तीर्थयात्रा आणि भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कथा सोहळा वाराणसी काशी (उत्तर प्रदेश) येथील राजघाट येथे होणार आहे. या सोहळ्यास भाविकांना येण्याची, जाण्याची व तेथील राहण्यासह जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन दहिवाळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री संत खंडोजी बाबा यांच्या प्रेरणेने वाराणसी काशी येथे या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.11 ऑगस्ट) अखंड हरिनाम सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. कलश पूजन ह.भ.प. भगवान महाराज मचे (चिचोंडी), नाथामाऊली जोजारे (आपेगाव), लक्ष्मण महाराज खेडकर, अंबादास मुरलीधर दहिफळे, मधुकरराव मैड, शिरीष महाराज कुलकर्णी, गंगाधर ढाकणे, देवराव ढाकणे यांच्या हस्ते होणार आहे. विना पूजन विष्णु महाराज आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे उपस्थितीत होणार आहे. तर भागवताचार्य ह.भ.प. कल्याणजी महाराज डहाळे (सातोनकर) भागवत कथेचे प्रवचन करणार आहे.
पहाटे काकडा आरती, सकाळी श्रीमद्‌ भागवत कथा, संध्याकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन रंगणार आहे. यामध्ये ह.भ.प. राम महाराज खेडकर (मुंगूसवाडे), हरी महाराज राऊत (मिंडसांगवी), लक्ष्मण महाराज हिंगे (मुंगसवाडे), भागवताचार्य जनार्धन महाराज माळवदे (अहमदनगर), रामानंद महाराज (बीड), भगवान महाराज मचे (चिचोंडी) यांचे कीर्तन होणार आहे. 17 ऑगस्ट रोजी सकाळी ह.भ.प. गुरुवर्य विकासनंद महाराज मिसाळ (पिंपळगाव वाघा) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या तीर्थयात्रा आणि भागवत कथा सप्ताहात सहभागी होण्यासाठी 9075244553 व 9423203945 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.