KBC च्या ६ सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये भुवनेश्वर येथील कृष्णा दास नावाचे स्पर्धक हॉट सीटवर बसले होते. दास यांनी शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांना ओडिशातील जगन्नाथ मंदिरातून आणलेला प्रसाद दिला. त्यानंतर खेळ सुरू झाला आणि त्यांनी साडेबारा लाख रुपये जिंकले. पण दास यांनी अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाबद्दल केलेल्या एका खुलास्यामुळे हा एपिसोड रंजक बनला.
खेळादरम्यान दास यांनी सांगितले की, त्यांना वाटते की त्यांची पत्नी त्यांच्यावर अजिबात प्रेम करत नाही. यावर अमिताभ यांनी विचारले की, त्यांना असं का वाटतं? यावर दास यांनी सांगितले की, जेव्हाही मी तुमचा चित्रपट पाहतो तेव्हा माझी पत्नी रागावते आणि म्हणते, “तुम्ही फालतू चित्रपट का पाहताय?” दास यांनी असं म्हणताच चेहऱ्यावरचे बदललेले भाव घेऊन अमिताभ म्हणाले, ‘थांबा, जरा तुम्ही बोलताय ते पचवू द्या.” त्यानंतर अमिताभ यांनी दास यांच्या पत्नीला विचारलं की ”आम्ही इतके फालतू चित्रपट बनवतो का?” हे ऐकून तिथे बसलेले प्रेक्षकही हसू लागले.