मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडला. ‘किआन अमित ठाकरे’ असे त्यांच्या नातवाचं नाव ठेवण्यात आलं. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना काही दिवसापुर्वी मुलगा झाला. तेव्हापासून राज ठाकरेंच्या नातवाचं नाव काय ठेवणार याची उत्सुकता अनेकांना होती.