अश्लील व्हिडिओ करणारा कीर्तनकार पोलिसांच्या जाळ्यात

0
2050

औरंगाबादः गंगापूर तालुक्यातील अश्लील व्हिडिओतील कीर्तनकार बाबाला बेड्या ठोकण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना अखेर यश आलं आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गंगापूरमधील या कीर्तनकार बाबाचा एका महिलेसोबतचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनांकडून कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

अखेर या महाराजाला गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे. बाळकृष्ण मोगल असे या अटक केलेल्या महाराजाचे नाव असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियात देण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीनुसार, हा व्हिडिओ मोगल यानेच चित्रीत केला असून तो या महिन्याच्या सुरुवातीला सोशल मीडियावर लीक झाला होता. मात्र कीर्तनकार महाराजांच्या अशा व्हिडिओमुळे संपूर्ण औरंगाबादमध्ये खळबळ माजली होती.