मी कुठेही लपून गेलो नाही … शरद पवारांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया…

0
30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्याच्या बैठकीचं काही मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं. ते कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी बैठकीला गेला हे मान्य करतो. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे अजित पवार म्हणाले. मी कधी लपून गेलो सांगा ना? असा सवाल अजित पवारांनी केला. चोरडिया यांचे आणि आमचे दोन पिढ्यांचे नाते आहे. चोरडिया हे पवारसाहेबांचे क्लासमेट आहेत. चोरडिया यांनी पवार साहेबांना जेवायला बोलावले होते. त्यावेळी जयंत पाटील देखील त्याठिकाणी पवारसाहेब यांच्यासोबत होते असे अजित पवार म्हणाले. दोन पिढ्या ओळखीच्या असणाऱ्या व्यक्तींच्या घरी जाणे काय चुकीचे? असेही अजित पवार यावेळी म्हणाले.