आपल्या शहराची नाट्य संस्कृती व चित्रपट क्षेत्रातील आलेख वेगाने वाढत असून नुकताच ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली यात नॉन फिचर फिल्म या गटात अनुष्का मोशन पिक्चर्स प्रस्तुत उद्योजक व निर्माते नरेंद्र फिरोदिया, पुष्कर तांबोळी, प्रणित मेढे निर्मित, अभिजित अरविंद दळवी लिखित दिग्दर्शित कुंकूमार्चन या लघुपटला पुरस्कार जाहीर झाला ही आपल्या शहरासाठी अभिमानाचा क्षण आहे. कलेला राजाश्रय हवा असतो कलाकारांच्या पाठीशी श्री.नरेंद्र फिरोदिया खंबीर पणे उभे असतात. सांस्कृतिक क्षेत्रात अहमदनगरचा लौकिक अर्थाने दबदबा वाढत आहे येथील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांना आपली सर्वोतोपरी मदत करू ,शहरातील चित्रीकरण स्थळांना परवानगी साठी एक खिडकी योजना साठी आपण शासन दरबारी पाठपुरावा ही करू तसेच लवकरच शहरातील नाट्य कलाकारांना स्वतःच्या हक्काचे नाट्य संकुल उभे राहत आहे ते लवकरच खुले करून देऊ, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
नगरच्या कलाकारांनी साकारलेल्या कुंकूमार्चन लघुपटाला ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कलाकारांचा सत्कार केला. यावेळी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्रवक्ते प्रा.अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट,साहित्य व सांस्कृतिक विभाग शहर अध्यक्ष श्रेणीक शिंगवी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जिल्हा समन्वयक शशिकांत नजान आदी उपस्थित होते.