Lal Mahal Pune
पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महालामध्ये एका तमाशाच्या गाण्यावर चित्रीकरण झाल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी मिळून हे चित्रीकरण केल्याची माहिती देखील समोर आली आहे. या गाण्याच्या व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या आठवणींचा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या लाल महालामध्ये अशा गाण्यांचं चित्रीकरण होणं हा लाल महालाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे. यानंतर कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण चिघळत जात असल्याचं पाहून वैष्णवीने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितील.






