एमआयडीसी रोडवर चंद्रमा मोबाईल शॉपीच्या सॅमसंग एक्स्लुझिव्ह स्टोअरचा शुभारंभ

0
92

एमआयडीसी रोडवर चंद्रमा मोबाईल शॉपीच्या सॅमसंग एक्स्लुझिव्ह स्टोअरचा शुभारंभ

नगर : नगर एमआयडीसी रोडवरील सनफार्मा कंपनीजवळ आनंद हाईटस्‌‍ येथील चंद्रमा मोबाईल शॉपीच्या सॅमसंग एक्स्लुझिव्ह स्टोअरचा शुभारंभ आ.शिवाजीराव कर्डिले व आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी स्टोअरचे संचालक निलेश पडोळे व देवीदास कर्डिले तसेच सूरज पडोळे, विशाल भांबरे, अजित जगताप, अजित पवार, रितेश सोनिमंडलेचा, अश्मिर शेख,
कुणाल देशमाने, सुमित फुलडहाळे आदी उपस्थित होते.

आ.शिवाजीराव कर्डिले म्हणाले, पडोळे व कर्डिले परिवाराने एकत्रित या भव्य मोबाईल शोरुमची मुहूर्तमेढ रोवली आहे. आताच्या काळात मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने चांगले फिचर्स असलेला मोबाईल घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. याठिकाणी ग्राहकांना अतिशय उच्च दर्जाची सेवा मिळेल असा विश्वास आहे.

आ.संग्राम जेगताप म्हणाले, एमआयडीसी परिसरात सॅमसंग कंपनीचे एक्स्लुझिव्ह स्टोअर खुले झाल्याने ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या खरेदीचा आनंद मिळणार आहे. शहराचे अर्थकारण वाढवायचे तर युवा वर्गाने व्यवस्थित अभ्यास करून व्यवसायात उतरले पाहिजे. व्यवसाय वाढल्यामुळे रोजगार निर्मिती होण्यासही मदत होते. पडोळे व कर्डिले यांनी मोबाईलचे वाढलेले महत्व लक्षात घेवून एका मोठ्या कंपनीचे शोरुम सुरू केले आहे. निलेश पडोळे हे पंधरा वर्षांपासून मोबाईल व्यवसायात असल्याने त्यांना या व्यवसायातील बारकावे चांगले माहित आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना विश्वसनीय सेवा मिळण्यात होईल.

निलेश पडोळे यांनी सांगितले की, या एक्स्लुझिव्ह स्टोअरमध्ये लाईव्ह डेमोची सुविधा उपलब्ध आहे. सॅमर्संगचे सर्व मोबाईल, अक्सेसरीज, स्मार्ट वॉच, टॅबलेट, लॅपटॉप याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कंपनीच्या विविध ऑफर्सचा लाभही ग्राहकांना मिळेल. याशिवाय विविध कंपन्यांच्या फायनान्सची सुविधाही उपलब्ध आहे. आता प्रजासत्ताक दिनानिमित्त खास ऑफर सुरु असून ग्राहकांनी शोरुमला आवर्जून भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी देविदास कर्डिले यांनी आभार मानले.