जंगलातील प्राण्यांच्या जगण्याबद्दल आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते. ते कसे आणि कुठे राहत असतील? काय खात असतील ? याविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. याच कारणामुळे प्राणी तसेच पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असतात. त्यातील अनेक व्हिडीओ हे शिकारीचे असतात. जंगलात प्रत्येक वन्यप्राण्याला जगण्यासाठी प्रत्येक क्षण मोठा संघर्ष करावा लागतो, थोडीशी बेफिकरीही त्याच्या जीवावर बेतते. त्याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओसुद्धा एका शिकारीचाच आहे. या व्हिडीओमध्ये एका बिबट्याने रानडुकराची अतिशय थरारक पद्धतीने शिकार केली आहे. या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशाच एका बिबट्यानं रानडुक्कराची शिकार केली. आश्चर्याची बाब म्हणजे, बिबट्याने रानडुक्कराची शिकारी केवळ ५ सेकंदात केली. बिबट्याचा हा वेग पाहता कोणी म्हणेल नजर हटी दुर्घटना घटी… पर्यटकांना काही कळण्याअगोदरच बिबट्याने रानडुक्कराची शिकार केली होती.
व्हिडिओ