राज्यात महायुतीचे मिशन 45 टार्गेट आहे. त्यासाठी भाजपने काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना आपल्या गोटात ओढले आहे. आता नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनीही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
लोकपोल सर्व्हेनुसार राज्यातील सत्ताधारी महायुतीला लोकसभा निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. महायुतील निवडणुकीत 21 ते 24 जागा मिळण्याची शक्यता आहेत. त्यातील 14-17 जागा या फक्त भाजपच्या असतील, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे. तर विरोधातील महाविकास आघाडीला बूस्ट मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेत आघाडीला 23-26 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातील 9-12 जागा या काँग्रेसच्या असल्याचा अंदाज आहे.






