निवडणुकीसाठी प्रचाराचे नियोजन केले जात आहे. जागावाटपाच्या तिढ्यात अडकलेल्या महायुतीने निवडणूक प्रचारासाठी समन्वय समन्वय समिती गठीत केली आहे. या समितीत महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून मंत्री गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून शंभूराज देसाई, उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि अनिल पाटील यांचा या समन्वय समितीत समावेश आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात तिन्ही पक्षात समन्वय राहावा यासाठी ही समिती काम करणार आहे.समितीतील मंत्री तिन्ही पक्षांच्या प्रचारात समन्वय साधणार आहेत. जेणेकरून निवडणूक प्रचारात काही व्यत्यय येऊ नये. या समितीसाठी पक्षांनी नावे दिल्यानंतर त्यापैकी प्रत्येकी दोन मंत्र्यांची निवड करण्यात आली. यानंतर समितीने आपल्या कामाला सुरुवात केली आहे.






