शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ४० आमदारांपाठोपाठ १२ खासदारांनीही शिवसेना मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीमधील ५० आमदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार देखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या धक्क्यानंतर आता शिवसेनेला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एक मोठा धक्का दिला आहे. या बंडखोर खासदारांनी गटनेता बदलण्याची केलेली मागणी मान्य करत राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीचा लोकसभा अध्यक्षांचा हा निर्णय शिवसेनेच्या बंडखोर खासदारांच्या गटासाठी मोठा दिलासा देणारा तर उद्धव ठाकरेंच्या गटासाठी धक्कादायक निर्णय मानला जात आहे.






