नगरमधील भाजपमधील अंतर्गत वाद…. जयंत पाटील म्हणाले निष्ठावंतांना…

0
35

भाजपमध्ये निष्ठावानांना डावलण्याचे काम‎ सुरू आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‎ ‎ काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना पहिल्या रांगेत बसवले जाते, पण निष्ठावंतांना भाजपात‎ स्थान नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपमधील‎ अंतर्गत वादावर बोलताना लगावला. तसेच‎ मविआतील जागा वाटपाबाबत अद्याप तीन‎ पक्षांची बैठक झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट‎ केले.‎

पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी‎ काँग्रेसची नऊ जूनला नगरमध्ये मोठी सभा‎ होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा व‎ मैदानाची पाहणी करण्यासाठी पाटील‎ शुक्रवारी (ता. २६) नगर दौऱ्यावर आले‎ होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख‎ पदाधिकारी, तसेच आमदार व माजी‎ आमदारांसमवेतही चर्चा केली. यावेळी‎ पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी‎ मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम‎ जगताप, आमदार किरण लहामटे, आमदार‎ नीलेश लंके, माजी आमदार दादा कळमकर,‎ पांडुरंग अभंग, अविनाश आदिक, घनश्याम‎ शेलार आदी उपस्थित होते.‎ गेला काही दिवसांपासून भाजपतील‎ अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून, नगर‎ जिल्ह्यामध्ये शिंदे व विखे यांच्यातील‎ अंतर्गत धूसफूस लपून राहिलेली नाही. त्या‎ अनुषंगाने पत्रकारांनी विचारले असता‎ पाटील म्हणाले, भाजपमध्ये निष्ठावानांना‎ डावलले जात असल्याचा टोला लगावला.‎ तसेच केंद्राकडून राज्याचे अधिकार‎ गोठवण्याचे काम अप्रत्यक्षपणे सुरू आहे.‎ केंद्राने आणलेल्या नवीन अध्यादेशासंदर्भात‎ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्व‎ राज्यात जात आहेत, असेही त्यांनी‎ सांगितले.‎