आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण आठरा जागांपैकी तब्बल 15 जागांवर मविआनं बाजी मारली आहे. तर तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यानं या निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून, भाजपचा पराभव झाला आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का माणला जात आहे.