शिंदे-फडणवीस सरकारने घेतला शाईचा धसका; ‘या’ ठिकाणी शाई पेनावर प्रतिबंध

0
22

सरकार कुठली गोष्ट किती गंभीरतेने घेईल याचा काही नेम नाही. काही वेळा अपेक्षित नसलेल्या आणि आश्चर्याचा धक्का देणाऱ्या गोष्टींचीही सरकारकडून दखल घेतली जाऊ शकते, याची प्रचिती आजपासून नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात आली आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर हिवाळी अधिवेशनात विधानभवन परिसरातील सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर शाई पेन आले आहेत. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारकडून विधिमंडळात शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला. तसेच विधिमंळात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे शाई पेन तपासण्यात येऊन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.तसेच विधिमंडळ परिसरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या खिशावर कर्मचारी नजर ठेवून होते. ज्यांच्या खिशाला शाईचे पेन होते, त्यांचे पेन कर्मचाऱ्यांकडून जप्त करण्यात आले