सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अभय मिळालं आहे. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने त्याची तयारी सुरू केली आहे. तब्बल एक वर्षानंतर हा विस्तार होणार आहे. विस्ताराची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी सरकार पातळीवर तशी लगबग सुरू झाली आहे.
भाजपकडून आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर, मनिषा चौधरी, मदन येरावार, संजय कुटे, संभाजी निलेंगकर पाटील, मेघना बोर्डीकर आणि राणा जगजितसिंह यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आशिष शेलार हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. पण त्यांना अल्पकाळ मिळाल्याने त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांनाही संधी दिली जात असल्याचं समजतं.






