राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. आता राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील दोन खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. राज्यात कोणाला मंत्री करावे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. येत्या दहा दिवसांत हा विस्तार व्हावा, अशी मला अपेक्षा असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितले. यावेळी राज्य मंत्रिमंडळात २० जणांना संधी मिळणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाही दोन मंत्री शिवसेनेचे होतील, असे त्यांनी सांगितले.






