maharashtra cabinet.. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं होतं. मात्र, प्रदेशाध्यक्षपदासह मंत्रीपदही देण्यात यावं अशी पटोले यांची मागणी होती. त्यावेळी पटोले यांची ही मागणी पूर्ण करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता नव्या फेरबदलावेळी पटोले यांची ही मागणी पूर्ण करण्यात येणार का? आली तर पटोले यांच्याकडे कोणतं खातं दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
येत्या 8 किंवा 9 एप्रिल रोजी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. कोरोनाचं संकट ओसरल्याने मंत्रिमंडळात फेरबदल करून पुन्हा नव्या दमाने राज्याच्या जनतेसमोर जाण्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं. याच बैठकीत मंत्रिमंडळ फेरबदलाची तारीख निश्चित करण्याबाबत आणि महामंडळांच्या नियुक्त्यांबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
काँग्रेसच्या काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नव्या फेरबदलात आपल्या वाट्याला मंत्रिपद यावे म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हायकमांडकडे सेटिंग लावल्याचं सांगितलं जात आहे.