महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत. भारतीय जनता पार्टीबरोबर सत्ता स्थापन करून जवळपास आठ महिने उलटले आहेत.
२०२४ मध्ये तुम्हीच मुख्यमंत्री असणार का? असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “हे पाहा, हे सर्व जनतेच्या हातात असतं. कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि कुणाला मुख्यमंत्री पदावरून हटवायचं, याचा निर्णय जनताच घेत असते. आम्ही काम करणार आहोत. आम्हाला दिवस रात्र एक करून काम करायचं आहे. आज आम्ही राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारत आहोत. आम्ही आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, शेती आणि पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात काम करत आहोत. आम्ही प्रत्येक क्षेत्राचा विकास करू इच्छित आहोत.”
मुख्यमंत्री शिंदे एबीपी माझा च्या कार्यक्रमात बोलत होते.






