मुंबई महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या दादर येथील कार्यालयामध्ये आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पण या बैठकीत खुर्चीवरून नाराजी नाट्य पाहण्यास मिळालं.
पत्रकार परिषद सुरू असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना बसण्यासाठी सन्माजनक जागा मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज झाले होते. महाराष्ट्र प्रभारी यांच्या आजूबाजूला माजी नेत्यांचा गराडा होता. पण, बसायला सन्मानजनक जागा नसल्याने विजय वडेट्टीवार नाराज झाले. त्यामुळे भर पत्रकार परिषदेतून विजय वडेट्टीवार निघून गेले. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. वडेट्टीवार अचानक उठून गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.