मी सभा घेतली नाही…पण ते चांगलच झाले….राम शिंदेंच्या निवडीनंतर अजितदादांची मिश्कील टिप्पणी

0
50

तर गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं :

अजित पवार

विधान परिषदेच्या सभापतीपदी आमदार प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड झाली. या निवडीनंतर शिंदे यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, या सभागृहाचे वैशिष्ट्य पाहील तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितलं मात्र आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत आहे. मधल्या काळात राम शिंदे सर तुम्ही म्हणालात अजित पवारांनी माझा इथ सभा घेतली नाही. माझ्यामुळे पराभव झाला अस आपण बोललात. मात्र जे झालं ते चांगल झालं आपण सभापती झालात. कदाचित आपण निवडून आला असता आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावं वाटलं असतं तर गिरीशच मंत्रिपद गेलं असतं, असा टोला त्यांनी यावेळी गिरीश महाजन यांना लगावला.