शिक्षकांना शाळा व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो. त्यावरून शिक्षक वर्गात नाराजीचा सूर आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसेंनी शिक्षक आणि अधिकाऱ्याची बैठक बोलावली होती.
शिक्षकांसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांवरील असलेलं अतिरिक्त कामाचं ओझंही कमी करण्याचं आश्वासन दादा भुसेंनी दिलं. शिक्षकांकडे निवडणुका, शासकीय सर्व्हे आणि इतर कामे दिली जातात. त्यावरून राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर असतो. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचा आढावा दादा भुसे यांनी घेतला.
दरम्यान, लवकरच शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून त्यांची पेंशनवर तोडगा काढला जाईल तसेच त्यांची शाळा व्यतिरिक्त कामे कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.






