बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली असून यावरून आता राज्यातील नेते आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देत आहेत. यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला आहे. संभाजीराजेंनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ”छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल.” त्यांनी कर्नाटक सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, ”रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत. त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल.”