वाडिया पार्क मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सुमारे 900 मल्ल सहभागी

0
79

वाडिया पार्क येथे कै.बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा रणसंग्राम चा शुभारंभ संपन्न

लाल मातीने देशाला स्वर्ण पदक मिळून दिले – पद्मश्री पोपटराव पवार

अहिल्यानगर : कुस्तीचे संस्कार नगरच्या लाल मातीत होते म्हणून ४ नगराध्यक्ष शहराला लाभले आणि लाल मातीने देशाला सुवर्णपदक मिळून दिले. मैदानाचे संस्कार खूप मोठे असून उद्याच्या पिढीच्या भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे मैदाने रिकामी पडले आहे. आजचा तरुण व्यसनाधीन्तेकडे वळत चालला असून त्याला पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. छत्रपती शाहू महाराजांनंतर वाडिया पार्क मैदानामध्ये आमदार संग्राम जगताप यांनी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. वाडिया पार्क मैदानामध्ये मी देखील क्रिकेट चे सामने खेळलो त्यामुळे देश पातळीवर खेळण्याची संधी मला मिळाली खेळाच्या माध्यमातून संस्कार मिळत असतात असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले
वाडिया पार्क येथे कै.बलभीमअण्णा जगताप क्रीडा नगरी मैदानात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा रणसंग्राम चा शुभारंभ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आयोजक आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अरुणकाका जगताप, माजी आमदार भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, माजी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर अध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, हिंदकेसरी योगेश दोडके, संदीप भोंडवे, संतोष भुजबळ, संजय शेंडगे, मनोज कोतकर, अविनाश घुले, अनिल गुंजाळ, सुभाष लोंढे, शिवाजी चव्हाण, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, अशोक शिर्के, दिनेश गुंड, धनंजय जाधव, भैया गंधे, रवि बारस्कर आदी उपस्थित होते आयोजक आमदार संग्राम जगताप म्हणाले की कुस्ती क्षेत्राची आवड ही खेड्यातील प्रत्येक गावकऱ्यांचे स्वप्न असते त्यामुळेच खेड्यापर्यंत कुस्ती पोहोचली आहे या स्पर्धेमध्ये कुठल्याही पैलवानावर अन्याय होणार नाही. या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला पंच सहभागी झाले आहे. त्यामुळे स्पर्धेचा दर्जा वाढलाय या स्पर्धेमध्ये सुमारे 900 मल्ल सहभागी झाले आहे आमचे आजोबा कै.बलभीमअण्णा जगताप यांनी नेहमीच कुस्ती क्षेत्रातील मल्लना आर्थिक मदत करत पैलवान घडविण्याचे काम केले आहे. पाया पडण्याची परंपरा कुस्तीच्या लाल मातीतून होत आहे शासकीय नोकरीमध्ये पहिल्या क्रमांकाच्या पैलवान ला सामावून घेतले जाते मात्र आता आपल्या सर्वांना शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल की दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या मल्लना देखील शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आपल्या शहरांमध्ये विविध खेळाचे सामने आयोजित करणे गरजेचे असून त्या नुसार खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान निर्माण होणार आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माद्यमातून खेळाडू लाल मातीची परंपरा आणि संस्कार घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले
पैलवान संतोष भुजबळ यांनी प्रास्ताविकात सांगितले की महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून २० कुस्तीपटू सहभागी झाले आहेत आंतरराष्ट्रीय दर्जेचे १५० पंच या ठिकाणी आले आहेत त्यामुळे सर्व कुस्त्या पारदर्शक होणार आहे कुस्ती स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भव्य-दिव्य अश्या स्पर्धा पार पडत आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अभय आगरकर, माजी आमदार भीमराव धोंडे, महेंद्रभैय्या गंधे आदींची भाषणे झाली यावेळी आभार प्रदर्शन शिवाजी चव्हाण यांनी मांडले