महाराष्ट्रात मान्सून कधी? हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज…

0
20

मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. पुढील 72 तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. बिपरजॉय चक्रिवादळाचा मोठा फटका हा मान्सूनच्या वाटचालीला बसला. त्यामुळे मान्सूनची प्रगती मंदावली. सामान्यपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी एक आठवडा उशिर झाला. मान्सून 8 जूनला केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे तो महाराष्ट्रात देखील उशिरा दाखल झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.