सुरक्षित नोकरीच हवी…डॉक्टर, वकील, इंजिनियर पोलिस भरतीच्या रांगेत

0
23

औरंगाबाद ग्रामीण पोलीस मुख्यालयामागील मैदानावर सध्या पोलीस शिपाईपदासाठी धावण्यासह शारीरिक चाचणीची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस शिपाईपदासाठी अर्ज करण्याची किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, या भरतीसाठी उच्चशिक्षितांची संख्या लक्षणीय आहे. या भरती प्रक्रियेत अन्य उच्चशिक्षितांसह एलएलबी, एलएलएमची पदवी घेतलेल्या दोन उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. पोलीस शिपाईपदासाठीच्या भरती प्रक्रियेत एक बीएचएमएस एमडी, एमई, बीई असे अनुक्रमे ३ आणि ३७ मिळून ४० अभियंते, २५ बी.टेक, १५ एमबीए उमेदवारांनी अर्ज केले आहेत.