तलाठी भरतीसह इतर सर्व भरती प्रक्रियेत काळाबाजार सुरु असून सरकार मुद्दामहून खासगी कंपनीकडून ही प्रक्रिया राबवत आहे. या भरतीचा पेपर अनेक वेळा फुटलेला असूनही चुकीचे घडूनही त्याची पाठराखण ह सरकार करत आहे यामध्ये सुधारणा न झाल्यास शिक्षक भरती, प्राध्यापक भरतीतील काळाबाजारा विरोधात आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये काळाबाजार सुरु आहे. सरकार मुद्दाहुन खाजगी कंपन्यांकडून भरती करत आहे. पेपर अनेक वेळा फुटलेले आहेत. त्यामध्ये एफआयआर दाखल होवुनही सरकार उलट पेपर कुठं फुटलाय असे म्हणत आहे. कुठेतरी चुकीचं घडतंय आणि त्याची पाठराखण सरकार करतंय.