बदली झाल्यानंतरही कामावरती रुजू न झालेल्या महसूल विभागातील 11 अधिकाऱ्यांचे निलंबन

0
41

बदली झाल्यानंतरही कामावरती रुजू न झालेल्या महसूल विभागातील 11 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. कामावरती रुजू होण्यासाठी या अधिकाऱ्यांना एप्रिल पासून अनेकदा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र या अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न आल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागाने अधिकाऱ्यांना थेट गर्भित इशारा दिलेला पाहायला मिळतोय. मात्र वर्षानुवर्ष अनेक अधिकारी क्रीम पोस्ट वरती राहतात. यांचाही प्रश्न आता ऐरणी वरती आलेला पाहायला मिळतोय.

आपल्या आवडीप्रमाणेच पोस्टिंग मिळाली पाहिजे हा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नेहमीच आग्रह पाहायला मिळतो. यासाठी ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून मनासारखी पोस्टिंग मिळवण्यासाठी कसरत करत असतात. हीच कसरत महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची ही सुरू होती. मात्र महसूल विभागाने या अधिकाऱ्यावर कारवाईचा चांगलाच बडगा उगारलेला पाहायला मिळतोय. बदली झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर 11 अधिकारी कामावर रुजू झाले नाही. या सर्वांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेले पाहायला मिळत आहेत.

एप्रिलमध्ये महसूल विभागातल्या बदल्या झाल्यानंतर जवळपास 35 अधिकारी कामावर रुजू झालेले नव्हते. यावेळी अनेकदा महसूल विभागाकडून त्यांना रुजू होण्यासाठी नोटीस काढल्या होत्या. त्यातील अनेक अधिकारी कामावर रूजू झाले. मात्र अधिकारी अद्याप ही रुजू झाले नाही. अखेर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची यादी

राज्यात मुंबई, पुणे, अमरावती , औरंगाबाद नागपूर आणि नाशिक असे सहा महसूल विभाग आहेत. या महसुली विभागापैकी नागपूर आणि अमरावतीसाठी अधिकारी रुजू हेण्यास शक्यतो तयार होत नाहीत. त्यामुळे नागपूर विभागात रुजू न होणाऱ्या सात तहसीलदारांना निलंबित करण्यात आल आहे.
विनायक थविल- (वडसादेसांगज- गडचिरोली)
– सरेंद्र दांडेकर (धानोरा गडचिरोली)
– बी.जे. गोरे (ऐटापल्ली गडचिरोली)
– पल्लवी तभाने (संजय गांधी योजना वर्धा)
– सुनंदा भोसले -(खरेदी अधिकारी नागपूर)
– बालाजी सूर्यवंशी -(अप्पर तहसीलदार नागपूर)
– सुचित्रा पाटील -(करमणूक शुल्क अधिकारी नाशिक).