राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार….शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांना मिळणार डच्चू !

0
21

राज्यात सत्तांतर होऊन आता वर्ष उलटलं आहे. पण तरीही मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार न झाल्यामुळे सत्ताधारी शिवसेना पक्षातील आमदारांमध्ये देखील धुसफूस आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. पण आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याच्या चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. पण नेमकं काय होतं ते मंत्रिमंडळाच्या विस्तारातूनच स्पष्ट होणार आहे.