वीज कर्मचाऱ्यांचा संप… नगरमध्ये मध्यरात्री पासूनच वीज गायब

0
21

महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत. राज्यातील अनेक भागात हेच चित्रं सुरू आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचे हाल होताना दिसत असून अजून दोन दिवस काढायचे कसे? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.

नगरमध्येही मध्यरात्री पासूनच वीज गुल झाली आहे.‌थंडीचे दिवस असल्याने पंखे, कुलरची गरज नसली तरी पाण्याच्या मोटारी, मोबाईल चार्जिंगचे प्रश्न निर्माण झाले आहे.