महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिकांना दाखले, मतदार नोंदणीसाठी मदत करणार, राज्यातील पहिलाच उपक्रम नगरमध्ये

0
19

महसूल विभागाच्या योजना विद्यार्थ्यांमार्फत लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी संगमनेर महसूल उपविभागाने सहा महाविद्यालयांशी सामंजस्य करार केला आहे. विशेष म्हणजे संगमनेर महसूल उपविभागाच्या पुढाकाराने या पद्धतीचा राज्यातील हा पहिला उपक्रम ठरला आहे.

सदर उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी हे सुमारे ३० लाभार्थ्यांपर्यंत पोहचून महसूल विभागाच्या योजना आणि ई प्रणालीच्या माध्यमातून दाखले तसेच मतदार नोंदणी करणार आहेत. याकरिता विद्यार्थ्यांना ग्रेड देण्यात येणार आहे. निश्चितच राज्यातील विविध विद्यालयांमध्ये देखील हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येईल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री. सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. सुहास मापारी, या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी श्री. शैलेश हिंगे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.