जालन्यात जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती.
त्यानंतर आता राज्य सरकारने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे