विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संजय शिरसाट उपस्थित होते.
त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे. कायंदे यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनिषा कायंदे यांच्यासह चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल आणि त्यांच्या पत्नीनेदेखील शिंदे गटात प्रवेश केला.