Sunday, May 12, 2024

मनोज जरांगे पाटलांनी थेट नावंच सांगितले राज्यात माझा एकच विरोधक….

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा सक्रीय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सहभाग घेतला नाही. परंतु विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार उभे करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. नारायण गड येथे आयोजित कार्यक्रमात मनोज जरांगे बोलत होते. यावेळी राज्यात आपला एकच विरोधक आहे. इतर कोणाला आपण विरोधक मानत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचे नाव न घेता सांगितले.
राज्यात येवला वाल्याला सोडता मी कुणाला विरोधक मानले नाही. आपले कोणीच विरोधक नाही. त्यांना कुणी ओबीसी नेता मानत नाही, असा हल्ला मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला. आपण लोकसभा निवडणुकीत नाही. या निवडणुकीत आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही. जे सगे सोयरे या विषयाच्या बाजूने आहे, त्याचा विचार करा. जे सगे सोयऱ्याच्या बाजूने नाही, त्यांना पाडा. त्यांचा पराभव असा करा की त्यांच्या दोन-तीन पिढ्या वर येऊ नये. त्यांना पाडण्यात आपला विजय आहे. मी कुणाला कॉल केला नाही की कुणाला मतदान करायचे हे सांगितले नाही. मराठा समाजाने आता ठरवायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles