नगर – जालना येथील अंतरवाली सराटा या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही दिवसापासून मराठा समाज चे वतीने आंदोलन सुरु होते परंतु काल अचानक पणे जो लाठी चार्ज करण्यात आला त्या घटनेचा इंडिया अहमदनगर च्या वतीने पत्रकार चोकातील शहीद भगतसिंग यांचे स्मारकजवळ निदर्शने करण्यात आली यावेळी राष्टवादी शहरजिल्हाध्यक्ष ( शरद पवार गट) माजी महापौर अभिषेक कळमकर भेरवनाथ वाकळे ,,समाजवादी पार्टीचे अजिमराजे ,युवक कॉगेस चे मोसीन शेख ,जनाधार संघटनेचे प्रकाश पोटे ,राजूभाई जहागीरदार ,अर्शद शेख ,ऍड सुधीर टोकेकर ,कॉ स्मिता पानसरे ,कॉ बन्सी सातपुते ,दिगंबर भोसले ,मेहबूब सय्यद ,बाळासाहेब माने आदी उपस्थित होते
शासन आपल्या दारी लाठ्या चालवी उरावरी असा फलक लावून या घटनेचा निषेध भगतसिंग यांच्या स्मारकाजवळ करण्यात आला
राष्टवादी कॉगेस शहरजिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले कि राज्याचे गृहमंत्री ज्या पद्धतीने आपली भूमिका मीडिया समोर येऊन मांडतात त्यापद्धतीने या घटनेची सखोल चोकशी केली जाईल का आपल्या न्याय हक्का साठी लढणारे मराठा समाज बांधव यांची कोणती चूक होती कि त्याच्यावर लाठी चार्ज करण्याचे आदेश दिले गेले .महाराष्टत अशा घटना घडणे म्हणजे हे निदनीय असल्याचे यावेळी सांगितले यामधील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे ते म्हणले