सोलापूर : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यावर भाजपचेच नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना कानपिचक्या दिल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण हवंच आहे, पण त्याचा भावनिक मुद्दा करू नका, असा सल्ला राधाकृष्ण विखे यांनी पंकजा यांना दिला आहे.