आदित्य ठाकरेंना इंग्रजी शाळेत का शिकवलं… स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केला मोठा खुलासा….

0
1058

मुंबई: Marathi.. ‘मराठी शाळे’च्या मुद्द्यावर ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दोन्ही मुले आदित्य व तेजस ठाकरे हे इंग्रजी शाळेत शिकल्याचा दाखला देतात. त्यावर आज प्रथमच स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

जास्तीत जास्त भाषा शिकणं हा काय गुन्हा नाही. पण इंग्रजी शाळेमध्ये असावी आणि घरामध्ये मराठीच असावी, अशी सक्त ताकीद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती, त्यामुळेच आपण आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांना इंग्रजी शाळेत घातलं,” असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येत आहे. त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही टीका झाली होती. हे मराठी-मराठी करतात, पण यांची नातवंडं इंग्रजी शाळेत जातात, असं लोक म्हणायचे. पण शिवसेनाप्रमुखांनी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की इंग्रजी शाळेतमध्ये आणि मराठी घरामध्ये आहे. घरात मॉम-डॅड वगैरे चालणार नाही. घरात आई-बाबा असंच बोललं पाहिजे. आजोबांनासुद्धा आजोबाच बोललं पाहिजे. फार तर फार आजा बोला.”
https://fb.watch/c7UiK7VVSM/