Home सांस्कृतिक लग्नात अन्नाची नासाडी वाचवायची ?…’असा’ एक माणूस ठेवाच..व्हिडिओ

लग्नात अन्नाची नासाडी वाचवायची ?…’असा’ एक माणूस ठेवाच..व्हिडिओ

0
50

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ एका लग्नसमारंभाचा आहे. जमलेले अनेक पाहुणे कार्यक्रमातील भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. तसेच व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक स्टीलचे भांडे ठेवण्यात आले आहे; ज्यात जेवण करून झाल्यानंतर ताटं भांड्यात ठेवली जातात. पण, या लग्नसमारंभात एक मोठा ट्विस्ट आहे. या स्टीलच्या भांड्याजवळ एक व्यक्ती उभा आहे आणि कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत आपल्या ताटातले सगळे जेवण संपवत नाही, तोपर्यंत स्टीलच्या भांड्याजवळ उभी असलेली व्यक्ती समोरच्या व्यक्तीचे ताट आपल्याजवळ घेत नाही. त्यातच जर पाहुण्यांच्या ताटात जेवण शिल्लक असेल तर ही व्यक्ती त्यांना परत पाठवून जेवण संपवून येण्यास सांगते.