अहमदनगर मनपा महापौर रोहिणी ताई शेंडगे व मनपा महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे यांच्या वतीने आयोजित श्रावण मासानिमित्त मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन संपन्न
नगर : समाजाने एकत्र येऊन आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करावे. जेणेकरून आपली संस्कृती परंपरा टिकून राहील याचबरोबर आजच्या युवा पिढीला आपल्या सणांबद्दल माहिती होईल श्रावण महिना हा पवित्र महिना म्हणून ओळखला जात आहे. यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असतात. श्रावण महिन्यामध्ये मंगळा गौरी कार्यक्रमाच्या माध्यमातून शंकर पार्वतीचे पूजन करण्यात येत असते. यामध्ये महिला एकत्रित येऊन फेर धरून मंगळागौरीचे खेळ साजरे करतात धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांनी एकत्र येऊन आपले धार्मिक उत्सव साजरे करावेत. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांसाठी मंगळागौरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असे प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले.
अहमदनगर मनपा महापौर रोहित शेंडगे व मनपा महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पाताई बोरुडे यांच्या वतीने श्रावण महिन्यानिमित्त आयोजित मंगळागौरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मा. महापौर सुरेखा कदम, नगरसेविका लताताई शेळके, राधिका ग्रुपच्या संचालिका राधिका सुवर्णफाठकी, आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या की महापालिकेमध्ये मंगळागौरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. शनी चौक येथील राधिका ग्रुपच्या महिलांनी फेर धरून मंगळागौरी चे विविध खेळ साजरे केले. या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळत असतो व या धकाधकीच्या जीवनामध्ये आनंदायी जीवन जगता येते असे त्या म्हणाल्या