एमबीए, एमसीए ‘सीईटी’साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

0
526

MBA CET
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या एम. बी. ए. / एम. सी. ए. २०२२ – २३ सी ई टी साठी अर्ज करण्याची मुदत 20 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली!

दरवर्षी एम. बी. ए. / एम. सी. ए. प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य शासना तर्फे सी ई टी घेतली जाते. हि सी ई टी देणे एम. बी. ए. / एम. सी. ए. प्रवेशासाठी अनिवार्य आहे. २०२२ – २३ साठी एमबीए-एमएमएस व एमसीए (Management) सीईटी २०२२ परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार या पदव् युत्तर पदवी अभ्यसिमास प्रवेश घेऊ इच्छित विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज www.mahacet.org या वेब्साईट वरून करायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख बुधवार, 20 एप्रिल 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सीईटी शिवाय या अभ्यास क्रमांना प्रवेश मिळत नाही. तसेच राज्य व केंद्र सरकारद्वारे मिळणाऱ्या विविध स्कॉलरशिप तसेच इतर सवलतीचा लाभ घेण्या करिता हि सी ई टी देणे अनिवार्य आहे.

एम. बी. ए. / एम. सी. ए. अभ्यास क्रमांनंतर करियर च्या खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. फॉर्म भरतांना काही अडचणी आल्यास अथवा शिष्यवृत्ती संबंधी काही माहिती हवी असल्यास बी.पी.एच.ई सोसायटीचे आय.एम.एस.सी डी अँड आर येथे प्रा.सय्यद मुदस्सर (एमबीए) 9881458579, डॉ. संजय भक्कड (एमसीए) 8208573938 या क्रंमाकावर संपर्क करावा असी माहिती डॉ. एम. बी मेहता, संचालक आयएमएससीडी अँड आर अहमदनगर यांनी दिली आहे.