नगरमध्ये रेल्वेस्थानकाच्या आधुनिकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर खा.विखे माध्यमांशी बोलत होते. खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, कर्जतच्या एमआयडीसीवरून अनेक टीका टिपण्या झालेल्या आहेत. मात्र, आ. पवार आणि आ. शिंदे यापैकी कोणीच मुद्द्यावर बोलत नाही. एमआयडीसी कोणी आणि कधी मंजूर केली हा चर्चेचा मुद्दा नाही. मात्र, एमआयडीसी मंजूर झाल्यावर त्याठिकाणी औद्योगिक विकास करण्यासाठी किती उद्योजक पुढे आले आणि त्याठिकाणी आम्ही व्यवसाय सुरू करणार यावर कोणीच बोलत नाही. केवळ एमआयडीसी मंजूर करून त्याठिकाणी जागा विकणे म्हणजे विकास नाही. कर्जत एमआयडीसीची अवस्था राहुरी, श्रीरामपूरच्या एमआयडीसी सारखी करायची का? असा सवाल करत जोपर्यंत उद्योग व्यवसाय सुरू होणार नाहीत, तोपर्यंत तरूणांना फायदा होणार नसल्याचे खा. डॉ. विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.