मंत्री अब्दुल सत्तार यांची खा. सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शेरेबाजी…राजकारणाची पातळी घसरली

0
1936

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची आज औरंगाबादेत सभा आयोजित करण्यात आली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ सिल्लोडमध्ये ही सभा होत आहे. यासाठीच्या तयारीबद्दल आढावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांची मुलाखत सुरु होती. लोकशाही वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने त्यांना विचारलं, सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर देण्यावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवीदेखील घातली. इतकी भिकार– झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ… असं उत्तर त्यांनी दिलं.

सदानंद सुळे यांच्या ट्विटर हँडलवरूनही हा व्हिडिओ टाकण्यात आला आहे. सदानंद सुळे यांचे हे अधिकृत ट्विटर हँडल आहे, याची पुष्टी अद्याप झालेली नाही. पुरुष सत्ताक विचारसरणीतून आलेलं हे वक्तव्य निंदनीय असल्याची टीका त्यावरून करण्यात आली आहे.