मंत्र्यांकडून दोन व्यक्तींना शिवीगाळ व मारहाण…. जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल केला ्हव्हिडिओ

0
28

बंदरे आणि खनीकर्म मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना शिव्या आणि मारहाण करताना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? असा प्रश्न विचारला आहे. पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे, कायदा सुव्यवस्थेचं काय? असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय.