अन्न पुरवठा नागरी मंत्री धनंजय मुंडे यांना अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भगवतगीता भेट
धनंजय मुंडे यांच्या विरोधात रचलेल्या राजकीय षडयंत्रातून ते बाहेर पडतील – वैभव ढाकणे
अहिल्यानगर : राज्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री धनंजय मुंडे नगरला आले असता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने भगवतगीता भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, संदीप पालवे, भीमराज आव्हाड, शिवाजी पालवे मेजर, राहुल सांगळे, शिवप्रसाद पालवे, ओंकार आव्हाड, तुषार भोस आदी उपस्थित होते,
यावेळी वैभव ढाकणे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेत जाऊन प्रश्न मार्गी लावण्याचे काम राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केले असल्यामुळे त्यांची असलेली लोकप्रियता पाहता त्यांना राजकारणातुन संपवण्यासाठी षडयंत्र रचले आहे मात्र ते लवकरच या षडयंत्रातून बाहेर पडतील असे ते म्हणाले.






