६ तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत तर ७ तारखेला निती आयोगाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्टलाच होऊ शकतो असं सांगितले जात आहे. त्यात रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सूतोवाच दीपक केसरकर यांनीही दिले. त्यात आज सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत काही ठोस निर्णय येण्याचीही शक्यता आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून आज पुन्हा सुनावणी घेतली आहे. त्यामुळे आज आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचाही मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे. खरी शिवसेना कुणाची असा वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात रंगला आहे.
भाजपाकडून ही नावे चर्चेत
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे
शिंदे गटाकडून ही नावे चर्चेत
गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, अब्दुल सत्तार






