मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदार बच्चू कडू सुरुवाती पासूनच नाराज आहेत, तर आज पुन्हा एकदा अमरावती बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ विस्तार या बद्दल अजून काही खरं दिसत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांची बैठक घेतली पाहिजे व मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्टता झाली पाहिजे. कारण विस्तारावरून बऱ्याच आमदारांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.






