संजय राऊतचं थोबाड फोडायची वेळ आली आहे…

0
26

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत संजय गायकवाड यांनी धमकीवजा इशारा दिला आहे. संजय राऊत यांचं आता थोबाड फोडायची वेळ आली आहे, असं संजय गायकवाड म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होता.

संजय गायकवाड म्हणाले, “संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अतिशय नीच आणि खालच्या पातळीवरील टीका केली आहे. आता त्याचं थोबाड फोडायची वेळ आली आहे. त्याची जीभ हासडायची वेळ आली आहे. ज्या पद्धतीने तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान करत आहे, त्यामुळे संजय राऊत जेव्हा समोर येईल तेव्हा मी त्याचे काय हाल करेन? हे येणाऱ्या काळात समजेल.”