भाजपशी चर्चा करून अंधेरीची निवडणूक बिनविरोध करा… शिंदे समर्थक आमदाराचेही मुख्यमंत्र्यांना पत्र

0
516

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रोज नवं वळण घेत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेची री ओढली आहे. प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणीच केलीय.
प्रताप सरनाईकांचं यांनी म्हटले आहे की,
शिवसेनेचे आमदार के. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनाने अंधेरी (पूर्व) भागात विधानसमेची पोटनिवडणूक घातली आहे. तिथे त्यांच्या पत्नी श्रीमती रुतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल कैसा आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी व आपल्या युतीचे उमेदवार त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

रमेश लटके हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. विधानसभेत काम करत असतांना मी सुनील राऊत आणि रमेश लटके आम्ही तिथे अनेक मह्त्याच्या विषयांवर एकत्रित बसून सल्ला मसलत करायचो. रमेश लटके नेहमी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवायचे, लोकांच्या प्रति काम करण्याची त्यांची तळमळ मी जवळून पाहिली आहे. शाखाप्रमुख पासून नगरसेवक आणि आमदार असा अत्यंत खडतर प्रवास त्यांनी केला होता. मला आजही आठवते कि. मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लटकनी अंधेरी भागात खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि स्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण उपस्थित होतात.

महाराष्ट्राची एक विशेष अशी अलिखित राजकीय संस्कृती आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी दुर्दैवाने मृत्युमुखी पडतो. तेस आपण त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून देण्याचा एक पायंडा आहे. हि निवडणूक बिनविरोध लेण्याच्या रहने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्राद्वारे त्यांचे मत मांडले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस सह अनेक पक्षांनी हिच भूमिका घेतली आहे. आपल्या युतीत हि जागा भारतीय जनता पक्षाला गेली आहे. परंतु राज्याचे प्रमुख या नात्याने आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हि निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेणे करून आपल्या महाराष्ट्रच्या राजकीय संस्कृतीचे जतन तर होईलच, पण त्याच सोबत के. रमेश लटकेना देखील एक वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल