आमदार रोहित पवार यांच्या आजोबांचं निधन…

0
1387

आमदार रोहित पवार यांचे आजोबा श्री. मोहनराव नामदेवराव भापकर (आईचे वडील) (रा. बारामती) यांचं काल वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. आजोबांना श्रद्धांजली अर्पण करताना आ.पवार म्हणाले की, अण्णा मला नेहमी सांगायचे की, ‘आपण आपलं कर्म प्रामाणिकपणे करत रहायचं. स्वतःच्या मनाने केलेल्या कामाचं कधी टेन्शन घ्यायचं नाही. प्रामाणिकपणे काम केलं तर एक अनामिक शक्ती आपल्याला नेहमी मदत करत राहते. तसंच आपण कुणाचीही कॉपी करायची नाही तर स्वतःची स्वतंत्र स्टाईल निर्माण करायची!’

आज अण्णा आपल्यात नाहीत, पण त्यांचं सांगणं कधी विसरता येणार नाही!
ओम शांती!